12 वी पास सरकारी नोकरी महाराष्ट्र 2024 | 12th Pass Government Job 2024

12 पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक विभागांमध्ये शासकीय नोकरीच्या संधी उपलब्ध असतात आपण आजच्या या लेखात 12 वी पास सरकारी नोकरी महाराष्ट्र 2024 संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

जर तुम्ही नुकतेच बारावी पास झालेल्या असाल तर तुम्हाला शासनाच्या विविध विभागांमध्ये नोकरी करण्यासाठी संधी मिळत आहे. या लेखात आपण काही बारावी पास नंतर निघणाऱ्या भरती संदर्भात माहिती जाणून घेऊया. खाली दिलेल्या सर्व भरती दरवर्षी वेळापत्रकानुसार निघत असतात त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी योग्य वेळी भरती सुरू झाल्यानंतर अर्ज करावा.

12 वी पास सरकारी नोकरी महाराष्ट्र 2024 लिस्ट:

12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा उपलब्ध असणाऱ्या अनेक सरकारी नोकरी संदर्भात माहिती आपण जाणून घेणार आहोत. बारावी पास सरकारी नोकरी महाराष्ट्र लिस्ट खाली दिलेली आहे.

1. इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक भरती 2024:-

भारतीय ग्रामीण डाक विभागामध्ये इंडिया पोस्ट च्या माध्यमातून दरवर्षी ग्रामीण डाक सेवक या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असते. ग्रामीण डाक सेवक अंतर्गत केवळ दहावी पास असणे आवश्यक आहे. या भारतीय डाक विभाग भरती अंतर्गत विद्यार्थ्यांची निवड दहावी मध्ये असलेल्या मार्कानुसार म्हणजेच गुणवत्तेनुसार करण्यात येते.

2. एसएससी एमटीएस भरती 2024:

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत एस एस सी एम टी एस या पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत असते. SSC MTS Recruitment 2024 चे सुद्धा कॅलेंडर प्रकाशित झालेले आहे. त्यामुळे ही सुद्धा भरती लवकर सांगा केंद्र सरकारची ही जॉब असणार आहे. संबंधित भरती अंतर्गत केवळ पात्रता ही दहावी उत्तीर्ण असून जर तुम्ही बारावी पास असेल तरीसुद्धा अर्ज करू शकता. या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 30 ते 35 हजार रुपये इतके वेतन मिळते.

3. जिल्हा न्यायालय भरती :-

महाराष्ट्र शासनाच्या विविध जिल्हा न्यायालयांमध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याकरिता ची जाहिरात निघालेली असून अजूनही बऱ्याच जिल्हा न्यायालयामध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. जिल्हा न्यायालय भरती 2014 महाराष्ट्र अंतर्गत काही पदांकरिता पात्रता दहावी तर काही पदांसाठी बारावी तर काही पदांसाठी ग्रॅज्युएशन आहे. शिपाई व हमाल तसेच लिपिक या पदाकरिता बारावी उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करू शकतात.

4. महाराष्ट्र पोलीस भरती 2024:

महाराष्ट्र राज्याच्या पोलिस विभागामध्ये मोठ्या प्रमाणात मेगा भरती सुरू करण्यात आलेली आहे, पोलीस भरती अंतर्गत जर तुम्ही बारावी पास उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तर अर्ज करू शकता. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पोलीस भरती अंतर्गत अर्ज करता येत आहे. पोलीस भरती अंतर्गत ग्राउंड तसेच लेखी परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण व्हावी लागते.

5. कोतवाल भरती 2024:

जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्हाला कोतवाल भरती अंतर्गत देखील अर्ज करता येतो. कोतवाल या पदाची परीक्षा अत्यंत सोपी असते तसेच तहशील लेवलवर ही परीक्षा देण्यात येते. ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणारे या परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर तुम्हाला कोतवाल म्हणून त्या गावासाठी नियुक्ती देण्यात येते. दर महिन्याला पंधरा हजार पेमेंट कोतवाल या पदासाठी मिळते.

अशाप्रकारे आपण आजच्या या पोस्टमध्ये 12 वी पास सरकारी नोकरी महाराष्ट्र संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे. 

विद्युत सहाय्यक या पदासाठी 5 हजार जागांची भरती , लगेच अर्ज करा

Leave a comment