कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मोठ्या संख्येने भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे, या संबंधित भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून, त्यामध्ये 490 जागांचा समावेश आहे, भरती प्रक्रिया गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा अंतर्गत भरली जातील, भरती संबंधी शैक्षणिक पात्रता, भरतीची जाहिरात अर्ज प्रक्रिया तसेच वयोमर्यादा अशी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती | Municipal Corporation Recruitment
भरतीचे ठिकाण- कल्याण डोंबिवली
पदसंख्या- 490
भरली जाणारी पदे- जाहिरात पहावी
वयोमर्यादा- काही पदासाठी 18 ते 30, इतर पदासाठी 18 ते 38 वर्षे
अर्ज प्रक्रियेची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 3 जुलै 2025
भरती संबंधित आवश्यक बाबी
- उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करत असताना ऑनलाईन पद्धतीने करणे गरजेचे आहे.
- अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्या अगोदर उमेदवारांनी भरती संबंधित खालील प्रमाणे देण्यात आलेली भरतीची जाहिरात योग्य प्रकारे वाचून त्यामध्ये आपण कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत या संबंधी संपूर्ण माहिती समजून घ्यावी.
- या भरतीमध्ये विविध प्रकारची पदे भरली जाणार असून यात विविध प्रकारच्या पदांनुसार शैक्षणिक पात्रता आहे त्यामुळे तुम्ही करत असलेले पद व त्यानुसार असलेली शैक्षणिक पात्रता समजून घ्यावी.
- खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये एवढी फी असेल.
- भरती संबंधित परीक्षेचा कालावधी हा आता जाहीर झालेला नसून यासंबंधी संपूर्ण माहिती देण्यात येईल.
- खालील प्रमाणे अर्ज प्रक्रिया व जाहिरात देण्यात आलेली आहे. जाहिरात संपूर्ण बघावी वाचावी व त्यानंतर अर्जाचा विचार करावा