आजकाल मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी नोकरीच्या शोधांमध्ये आहे अशा स्थितीमध्ये नोकरीच्या संधी कुठे उपलब्ध होतील याची वाट त्यांना लागून असते व अशाच उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आलेली आहे या महानगरपालिकेमध्ये मोठी बंपर भरती केली जाणार आहे व चांगला पगार उमेदवाराला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर या भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने लगेच अर्ज करायचा आहे. यामध्ये दहावी बारावी पास उमेदवार सुद्धा अर्ज करून नोकरीसाठी पात्र ठरू शकणार आहे त्यामुळे अशा उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती | Mahanagarpalika Bharti
पदाचे नाव – अग्निशमन विमोचक
भरल्या जाणाऱ्या जागा – 150 जागा
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन पद्धतीने
अटी व शर्ती
- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निघालेल्या भरतीमध्ये उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे कारण इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज प्रक्रिया भरतीसाठी स्वीकारली जाणार नाही.
- शैक्षणिक पात्रतेच्या अटिमध्ये उमेदवार पात्र असणे गरजेचे आहे, शैक्षणिक पात्रता व संबंधित संपूर्ण माहिती बघण्यासाठी अर्ज करण्यापूर्वीच भरती संबंधित जाहिरात बघणे अत्यंत गरजेचे आहे.
- तसेच परीक्षा व उमेदवाराची निवड कशा पद्धतीने केली जाईल हे सुद्धा संबंधित भरतीच्या जाहिरातीमध्ये देण्यात आलेले असून भरतीची जाहिरात सर्वात शेवटी देण्यात आलेली आहे.
- अर्ज करत असताना एका पदासाठी एकाच आरक्षणांमधून अर्ज करावा लागेल जर इतर वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज केल्यास अर्ज नाकारला जाईल.
- शैक्षणिक पात्रते संबंधित संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरावी तसेच आवश्यक कागदपत्रे सुद्धा अर्ज करताना योग्य साईज नुसार अपलोड करावी लागणार आहे एकदा अपलोड केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
वयोमर्यादा- जाहिरात बघा
पगार – 19900 रूपये ते 63200 रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17मे 2024
अर्ज करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी
- अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात वाचावी त्यामध्ये अर्ज शुल्काची माहिती दिलेली असून अर्ज शुल्क कोणत्या प्रवर्गासाठी किती आहे त्यानुसार योग्य पद्धतीने भरावे लागणार आहे.
- तसेच कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती अर्जामध्ये भरली, व ती आढळून आल्यास अर्ज बाद केला जाईल.
- अर्ज करत असताना अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात घ्यावी त्या तारखेनंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही त्यामुळे संबंधित शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत असेल.