देशामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे खुप शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी मिळवणे अशक्य झालेले आहे व अशाच नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत आनंदाची व महत्त्वाची एक सुवर्णसंधी म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये भरती निघालेली आहे यामध्ये अगदी सहजरित्या उमेदवारांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करून भरती अंतर्गत नोकरी मिळवता येणे शक्य होणार आहे त्यामुळे या अंतर्गत कोणती पात्रता आहे हे संपूर्ण माहिती बघूयात.
जिल्हा सत्र न्यायालय भरती | Jilha Satra Nyayalay Bharti
पदाचे नाव – सफाई कामगार
भरल्या जाणाऱ्या जागा – 1
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन पद्धतीने
शैक्षणिक पात्रता – 4 थी पास
अटी व शर्ती
- उमेदवाराला अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने पूर्ण करावी लागणार आहे त्यामुळे इतर कोणताही पर्याय उमेदवारापुढे उरणार नाही ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारला जाईल.
- अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा तपासून घ्यावी वयोमर्यादेमध्ये उमेदवार पात्र ठरणार असेल तरच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
- अर्ज शेवटच्या तारखेच्या आतच करायचा आहे त्यानंतर कर्ज स्वीकारला गेला नसल्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहतील.
- नोकरीचे ठिकाण महाराष्ट्रातील अहमदनगर असणार आहे त्यामुळे पूर्व विचार करून अर्ज प्रक्रिया करावी. शैक्षणिक पात्रतेमध्ये सुद्धा चौथी पास उमेदवार असावा.
पगार – 15000 ते 47 हजार रुपये
वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
भरतीची जाहिरात व अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी इथे बघा
अर्ज करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी
- 24 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्या तारखेपर्यंत अर्ज करावा, अर्ज करताना संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरणे आवश्यक आहे चुकीची आढळल्यास अर्ज बाद केला जाईल.
- उमेदवार सुदृढ व स्वच्छतेचे उपकरणे हाताळण्याचा अनुभव असलेला हवा कारण सफाई कामगारासाठीची ही जागा आहे.
- योग्य पत्त्यावर वेळेच्या आत अर्ज सादर करावा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर, डी.एस.पी. चौक, न्यायनगर, अहमदनगर-४१४ ००१