महावितरण च्या माध्यमातून काही ठराविक जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे, त्यामुळे तुम्ही जर महावितरणच्या माध्यमातून भरतीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल, यामध्ये चंद्रपूर विभाग, बल्लारशा विभाग, वरोरा विभाग अशा प्रकारच्या विविध तीन विभागांमध्ये ही महावितरण ची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया असेल त्याच पद्धतीने उमेदवाराची काही शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादे संबंधित संपूर्ण अटी जाणुन घेण्याचा प्रयत्न करूया.
महावितरण भरती 2025 | Mahavitran Bharti 2025
भरतीचे ठिकाण- चंद्रपूर विभाग, बल्लारशा विभाग, वरोरा विभाग
एकूण पदसंख्या – 128 जागा
अर्ज प्रक्रियेची पद्धत- ऑनलाइन
वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
पदांची नावे व पद संख्या –
- चंद्रपूर विभाग
- 1. वीजतंत्री – 26
- 2. तारतंत्री – 16
- 3. कोपा – 10
- बल्लारशा विभाग
- 1. वीजतंत्री- 21
- 2. तारतंत्री- 10
- 3. कोपा- 8
- वरोरा विभाग
- 1. वीजतंत्री- 17
- 2. तारतंत्री- 14
- 3. कोपा- 6
भरती संबंधित आवश्यक बाबी
- अर्ज करत असताना उमेदवारांनी वयोमर्यादा त्याच पद्धतीने इतर सर्व प्रकारच्या अटी समजून घेऊन त्यानंतर अर्ज प्रक्रिया करावी.
- अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जाणार आहे, त्यामुळे इतर कोणतेही पद्धतीचा स्वीकार अर्ज प्रक्रियेमध्ये केल्या जाणार नाही.
- अर्ज प्रक्रिया शेवटच्या तारखेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे.
- वरील प्रमाणे देण्यात आलेल्या भरतीमध्ये वीजतंत्री तारतंत्री व कोपा या तीनही पदासाठी विविध प्रकारची शैक्षणिक पात्रता आहे त्यामुळे ते तुम्ही जाणून घ्यावी.
- एसएससी गुणपत्रिकेच्या नावा नुसार संपूर्ण माहिती भरावी, उमेदवारांनी अर्ज करत असताना कोणत्याही एका विभागासाठी अर्ज करावा एकापेक्षा जास्त विभागासाठी अर्ज केल्यास अर्ज नाकारला जाईल.