यूपीएससीच्या माध्यमातून जवळपास 494 जागांची भरती प्रक्रिया पार पाडली जाणारा असून, या संबंधित जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली असल्याने, जे उमेदवार यूपीएससी या परीक्षेसाठी तयारी करत आहेत अशांसाठी महत्त्वाची बातमी आहे, ज्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची असेल, त्यांनी ऑनलाईन पद्धतीने शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, संबंधित अर्ज प्रक्रियेची तारीख व संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. त्याच पद्धतीने वयोमर्यादा संबंधित आवश्यक बाबी व पात्रता उमेदवाराला जाणून घेणे गरजेचे असेल.
UPSC परीक्षा भरती | UPSC Bharti
संबंधित भरतीचे ठिकाण- संपूर्ण भारत
भरली जाणारी एकूण पदसंख्या- 494 जागा
अर्ज प्रक्रिया- ऑनलाइन पद्धतीने
पदाचे नाव – खालील जाहिरात बघावी
अर्ज करत असताना लक्षात घ्यावयाच्या बाबी
- अर्ज प्रक्रिया पूर्ण करत असताना त्या संबंधित आवश्यक असणाऱ्या संपूर्ण अटी शर्ती संपूर्ण बाबी लक्षात घेणे गरजेचे असेल.
- अर्ज करण्यापूर्वी खालील भरतीची जाहिरात वाचून घेणे बंधनकारक आहे त्यामध्ये देण्यात आलेली वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता हे सुद्धा जाणून घ्यावी.
- उमेदवाराला शैक्षणिक पात्रते संबंधित सांगायचे झाल्यास विविध पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता लागू असणार आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात त्यावर शैक्षणिक पात्रता अवलंबून असणार आहे.
वयोमर्यादा – 30 ते 45 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 12 जून 2025
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अर्जाची शेवटची तारीख वरील प्रमाणे देण्यात आलेली असून त्या तारखेपर्यंत अर्ज करावा परंतु त्या तारखेनंतर केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्जातील संपूर्ण माहिती भरल्यानंतर अर्ज जमा करत असताना उमेदवाराला 25 रुपये एवढे अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
- अधिक माहिती तसेच संपूर्ण पद व त्यांची नावे बघण्यासाठी खालील जाहिरात बघावी, त्यामध्ये एकूणच संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.